पुष्कर जेव्हा बायकोशी पंगा घेतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:57 IST2017-06-19T03:06:13+5:302023-08-08T15:57:33+5:30
अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या मनात येईल ते बेधडकपणे व्यक्त करतो. मग ते एखादं स्किट असो किंवा मग एखादा पुरस्कारसोहळा. त्याला त्यावेळी जे सुचेल तो बिनधास्तपणे व्यक्त करतो.

पुष्कर जेव्हा बायकोशी पंगा घेतो!
अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या मनात येईल ते बेधडकपणे व्यक्त करतो. मग ते एखादं स्किट असो किंवा मग एखादा पुरस्कारसोहळा. त्याला त्यावेळी जे सुचेल तो बिनधास्तपणे व्यक्त करतो. विविध पुरस्कारसोहळे, कार्यक्रमांमध्ये रसिकांना आणि पुष्करच्या चित्रपटसृष्टीतील त्याच्या मित्रांना याची प्रचिती आली आहे. त्याच्या या बेधडक स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा एका कार्यक्रमात आली. मात्र यावेळी त्याच्या बोलण्यात त्याचे मित्र आणि मैत्रिणींचा उल्लेख नव्हता. यावेळी त्याने उल्लेख केलेली व्यक्ती म्हणजे त्याची बायको. पुष्करने या कार्यक्रमात आपल्या पत्नीविषयी एक किस्सा रसिकांसमोर सांगितला. पुष्करची पत्नी ही ख्रिश्चन आहे. ती उत्तम जेवण बनवते, असं पुष्करने सांगितलं. मात्र खोड्या करणे, गंमती करणे हा जणू काही पुष्करचा स्वभावधर्मच. त्यामुळेच की काय घरीही त्याचा हा गुणधर्म लपून राहत नाही. पत्नी जेवण बनवत असताना तिच्या कामात वारंवार अडथळा निर्माण करतो. एखादं जर मन लावून काम करत असेल आणि कुणी त्यात अडथळा निर्माण केला तर साहजिकच त्याला ती गोष्ट खटकणार हे स्वाभाविकच आहे. पुष्करच्या पत्नीच्या बाबतीतही अगदी हेच होतं. जेवण बनवताना आपण अडथळा निर्माण केला किंवा तिला त्रास दिला तर आपल्या पत्नीला ते बिल्कुल आवडत नाही, अशी कबुलीही पुष्करने यावेळी मान्य केलं. आता आम्ही तर पुष्करला हेच सांगू मित्र-मैत्रिणींशी पंगा घेणं ठीक मात्र बायकोशी पंगा ना ले!