मंगेश देसाईची मतदान करण्यासाठी जनजागृती
By Admin | Updated: February 8, 2017 03:33 IST2017-02-08T03:33:35+5:302017-02-08T03:33:35+5:30
सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण रंगत आहे. सगळीकडे प्रचाराची धूम निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपला उमेदवार निवडून यावा

मंगेश देसाईची मतदान करण्यासाठी जनजागृती
सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण रंगत आहे. सगळीकडे प्रचाराची धूम निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी सडेतोड मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. मात्र, नागरिक याकडे लक्ष न देता निवणुकीचा दिवस हा सुटीचा दिवस म्हणून बाहेरगावी जाणे पसंत करीत असल्याचे पाहायला मिळते. अशाच काही नागरिकांना जागे करण्यासाठी कलाकारांनी पुढाकार घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यांची ही जबाबदारी पटवून देण्यासाठी अभिनेता मंगेश देसाई याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तो नागरिकांना मतदान करण्याचे महत्त्व पटवून देताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगेश या व्हिडीओच्या माध्यमातून सांगतो, ‘निरोगी शरीरासाठी जशी व्यायामाची गरज असते, त्याप्रमाणे प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदान करण्याची आवश्यकता असते. तुमचे मत, तुमची ताकद असते. असा संदेश तो नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.