सईने केले राजकुमारचे कौतुक
By Admin | Updated: April 25, 2017 23:51 IST2017-04-25T23:51:20+5:302017-04-25T23:51:20+5:30
सई राजकुमार रावच्या ‘राब्ता’ चित्रपटातील लुकच्या प्रेमात पडली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना राजकुमार रावचा खूप वेगळा लुक पाहायला मिळत आहे.

सईने केले राजकुमारचे कौतुक
सई राजकुमार रावच्या ‘राब्ता’ चित्रपटातील लुकच्या प्रेमात पडली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना राजकुमार रावचा खूप वेगळा लुक पाहायला मिळत आहे. त्याने या चित्रपटात एका ३२४ वर्षांच्या माणसाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील त्याचा मेकअप हा खूपच वेगळा आहे. या भूमिकेचा पहिला लुक प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर हा राजकुमारच आहे का? हा प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला. एक आश्चर्याचा धक्का राजकुमारने प्रेक्षकांना या चित्रपटातून प्रेक्षकांना दिला आहे. या चित्रपटात राजकुमार एका छोट्याशा भूमिकेत असला तरी नायक-नायिकांपेक्षा त्याच्याच भूमिकेची चर्चा अधिक आहे. त्याच्या या लुकचे सध्या सगळेच कौतुक करीत आहेत. सई ताम्हणकर त्याच्या या लुकच्या प्रेमात पडली असून तिने तसे सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे. तिने टिवटर या सोशल नेटवर्किंग साईटवर टिवट केले आहे. या टिवटमध्ये तिने म्हटले आहे की, ‘वा मॅन... यू आर फुल आॅफ सरप्राइझेस...’ यावरूनच सईला राजकुमारचा लुक किती आवडला, हे आपल्याला कळून येत आहे.