प्रियंकाचा चित्रपट लटकला
By Admin | Updated: August 6, 2014 22:46 IST2014-08-06T22:46:01+5:302014-08-06T22:46:01+5:30
प्रसिद्ध शायर आणि फिल्मी गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर आधारित असलेला ‘बायोपिक’ काही काळासाठी लटकला आहे.

प्रियंकाचा चित्रपट लटकला
>प्रसिद्ध शायर आणि फिल्मी गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर आधारित असलेला ‘बायोपिक’ काही काळासाठी लटकला आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि इरफान खान मुख्य भूमिकेत दिसणार होते. लेखिका अमृता प्रीतम यांच्या नातवाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांचे नाते पडद्यावर दाखवले जाऊ नये, अशी त्याची मागणी आहे. अमृता यांच्या कुटुंबियांना जेव्हा समजले की, अशा विषयावर आधारित एखादा चित्रपट बनवला जातोय, तेव्हा ते निर्मात्यांना भेटले होते. नेहमीच साधारण आयुष्य जगणा:या अमृता प्रीतम यांच्यावर एखादा चित्रपट बनावा, अशी त्यांची इच्छा नव्हती; पण निर्मात्यांनी त्यांचे म्हणणो गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आता कायद्याचा आधार घेत निर्मात्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.