क्वॉन्टीकोमुळे प्रियंकाची जोरदार चर्चा
By Admin | Updated: October 26, 2015 00:34 IST2015-10-26T00:34:34+5:302015-10-26T00:34:34+5:30
क्वॉन्टीकोच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे. या अॅक्शन थ्रीलर अमेरिकन शोच्या माध्यमातून प्रियांकाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

क्वॉन्टीकोमुळे प्रियंकाची जोरदार चर्चा
क्वॉन्टीकोच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे. या अॅक्शन थ्रीलर अमेरिकन शोच्या माध्यमातून प्रियांकाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. भारतातल्या चाहत्यांमुळे प्रियांका चोप्रा क्वॉन्टीकोमध्ये यशस्वी ठरली आहे. अमेरिकेतल्या टीव्ही सिरियलमध्ये भारतातील अभिनेत्री यशस्वी भूमिका करत असल्याचा भारतीयांनाही गर्व आहे. त्यामुळेच तिला अमेरिकेत मिळत असलेला प्रतिसाद वाखानण्याजोगा आहे. अपने बेटी ने कुछ कर दिखाया है...अशी येथील लोकांची भावना आहे. एका भारतीयाचे यश हे आपल्या सगळ््यांचे यश आहे, अशा भूमिकेतून तिला दाद मिळत आहे. निमरत कौर आणि राहुल खन्ना यांनी काही वक्तव्य केली असली, तरी प्रियांकाच्या चाहत्यांनी तिला चांगला प्रतिसाद दिल्याचे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही. क्वॉन्टीकोमध्ये सर्वांना तिच्याबद्दल अभिमान वाटावा, असाच तिचा रोल राहिलेला आहे. प्रियांकाने भूमिकेचे बेअरिंग व्यवस्थित सांभाळले आहे. हा शो म्हणूनच लोकप्रिय ठरत आहे. या शोच्या निर्मात्यांना शो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायचा आहे. या क्रमात भारतीय प्रेक्षकांना आकर्षिक करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वीही झाला आहे.