प्रियंकाचा ‘दबंग’ लूक!
By Admin | Updated: July 27, 2015 02:12 IST2015-07-27T02:12:57+5:302015-07-27T02:12:57+5:30
प्रि यंका चोप्राने आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. प्रकाश झा यांचा आगामी चित्रपट ‘गंगाजल २’ मध्ये प्रियंका एका

प्रियंकाचा ‘दबंग’ लूक!
प्रि यंका चोप्राने आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. प्रकाश झा यांचा आगामी चित्रपट ‘गंगाजल २’ मध्ये प्रियंका एका पोलिस आॅफिसरच्या भूमिकेत मेकअप शिवाय दिसेल. तिने यात आभा माथुर नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अजय देवगणची मुख्य भूमिका आहे. सामाजिक विषयांवर आधारित ‘गंगाजल’ चित्रपटात प्रकाश झा यांनी अजयला अपराध्यांचा सामना करतांना दाखवले. दुसऱ्या भागात प्रियंकाच्या समोर कोणकोणती आव्हाने ठेवली आहेत हे चित्रपट पाहिल्यावर समजेल. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासाठी ती पुढील सहा महिने अमेरिकेतच राहणार आहे म्हणे. मात्र ‘बाजीराव मस्तानी’ची शूटिंग पूर्ण करण्यासाठी ती काही दिवसांसाठी भारतात परत येऊ शकते.