किरण बेदींच्या भूमिकेत प्रियंका
By Admin | Updated: September 18, 2014 23:39 IST2014-09-18T23:39:36+5:302014-09-18T23:39:36+5:30
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिकची धूम आहे. या चित्रपटांना चांगले यशही मिळत आहे. त्यामुळे निर्मात्यांचे लक्ष सध्या अशा व्यक्तिमत्वांकडे आहे,

किरण बेदींच्या भूमिकेत प्रियंका
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिकची धूम आहे. या चित्रपटांना चांगले यशही मिळत आहे. त्यामुळे निर्मात्यांचे लक्ष सध्या अशा व्यक्तिमत्वांकडे आहे, ज्यांच्यावर चित्रपट बनवता येईल. पोलीस अधिकारी किरण बेदीही खूप चर्चेत राहिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट बनवण्याची तयारी एका निर्मात्याने केली आहे. सध्या तरी त्याची ही योजना प्राथमिक टप्प्यात आहे. ही भूमिका प्रियंका चोप्रा निभावणार असल्याचे सांगितले जात आहे. वर्तमानातील प्रतिभावंत अभिनेत्रींमध्ये प्रियंकाचे नाव आघाडीवर आहे. मेरी कॉम या चित्रपटासाठी तिने खूप मेहनत केली आहे. तशाच मेहनतीची आणि गांभीर्याची गरज किरण बेदी यांच्या भूमिकेसाठीही आहे. त्यामुळे तिचे नाव या चित्रपटासाठी जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.