प्रियांका झाली भावूक; सोडावे लागणार हॉलिवूड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 23:38 IST2017-04-18T23:38:00+5:302017-04-18T23:38:00+5:30
प्रियांका चोप्राला भारतातील असंख्य चाहते मिस करताहेत. पण येत्या दिवसांत प्रियांका हॉलिवूड मिस करणार आहे.

प्रियांका झाली भावूक; सोडावे लागणार हॉलिवूड!
tyle="text-align: justify;">प्रियांका चोप्राला भारतातील असंख्य चाहते मिस करताहेत. पण येत्या दिवसांत प्रियांका हॉलिवूड मिस करणार आहे. होय, आपल्या हॉलिवूड करिअरसाठी प्रियांकाने गेल्या वर्षभरापासून न्यूयॉर्कला आपले दुसरे घर बनवले होते. पण आता हे दुसरे घर सोडण्याची वेळ आलीय. प्रियांकासाठी हा भावूक करणारा क्षण आहे. न्यूयॉर्कमध्ये सामानाची बांधाबांध करताना प्रियांकाला भरून आले. सोशल मीडियावर तिने तिच्या या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘घरातील सामान पॅक करणे किती भावूक करणारे आहे. अनेक अशा गोष्टी मिळतात, ज्यांचा तुम्हाला विसर पडलेला असतो. न्यूयॉर्कमध्ये शेवटचा आॅफिशिअल वीक...’, असे प्रियांकाने टिष्ट्वटरवर लिहिले आहे.
अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’चे दुसरे सीझन आणि ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटासाठी प्रियांका न्यूयॉर्कमध्ये राहतेय. तिचे हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत. या प्रोजेक्टनंतर प्रियांकाने हॉलिवूडचे काही चॅट शो केले. हॉलिवूड सेलिब्रिटींसोबत अनेक इव्हेंटमध्ये क्वालिटी टाईम घालवताना ती दिसली. पण आता ती भारतात परतण्याची वेळ आली आहे. हॉलिवूडचा नवा प्रोजेक्ट मिळत नाही, तोपर्यंत प्रियांकाला भारतात परतावे लागणार आहे.