प्रियांका बनली निर्माती...
By Admin | Updated: January 24, 2016 01:53 IST2016-01-24T01:53:14+5:302016-01-24T01:53:14+5:30
‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही मालिकेतील अभिनयामुळे बॉलीवूड ब्युटी
प्रियांका बनली निर्माती...
‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही
मालिकेतील अभिनयामुळे बॉलीवूड ब्युटी
प्रियांका चोप्रा हिला आंतरराष्ट्रीय स्तरावर
ओळख मिळाली. यानंतर प्रियांका आता नव्या भूमिकेत रमली आहे. तिने ‘इट्स माय सिटी’ या मोबी-सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. नेक्सजीटीव्ही या व्हिडीओ एन्टरटेन्मेंट मोबाइल अॅपने यासाठी पुढाकार घेतला असून, प्रियांका याची सहनिर्माती आहे. खुद्द प्रियांकानेच ट्विटरद्वारे या नव्या प्रोजेक्टबाबत माहिती दिली. मुंबईत जीवनाशी झुंजणाऱ्या ४ मुलींची ही कथा आहे. १४ भागांची ही मालिका आठवड्यातून दोनदा प्रसारित होणार आहे.