प्रिया झाली साइज झीरो

By Admin | Updated: August 11, 2016 03:35 IST2016-08-11T03:35:10+5:302016-08-11T03:35:10+5:30

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी प्रिया बापट आता प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. आजपर्यंतच्या तिच्या सगळ्या चित्रपटांमध्ये तिने

Priya got the size zero | प्रिया झाली साइज झीरो

प्रिया झाली साइज झीरो

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी प्रिया बापट आता प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. आजपर्यंतच्या तिच्या सगळ्या चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीची ही बबली गर्ल सध्या खूपच बारीक झालेली दिसत आहे. प्रिया तिच्या फिटनेसबाबत फारच जागृत असते. तिने बरेच वजन कमी केल्याचे तिच्या सध्याच्या काही फोटोंमधून दिसत आहे. याविषयी प्रियाने ‘सीएनएक्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या फिटनेस फंड्याविषयी उलगडा केला. प्रिया सांगते, मला नेहमीच फिट राहायला आवडते. तुम्ही जेवढे निरोगी राहाल तेवढे चांगले काम करू शकता. तसेच व्यायाम केल्याने खूपच ऊर्जा मिळते, ताजेतवाने वाटते आणि काम करण्यासाठी एनर्जी मिळते. मला जिममध्ये वर्क आऊट करायला खूप आवडते. त्यामुळे मी वजन कमी करण्यापेक्षा फिटनेसवर जास्त भर देते. रोज मी सकाळी व्यायाम करते. एवढेच नाही तर मला स्विमिंग करायलाही आवडते. पोहणे हा खूपच चांगला व्यायाम आहे. जिम आणि स्विमिंग या दोन गोष्टींमुळेच आज मी फिट आहे. केवळ चित्रपटांमध्ये चांगले दिसावे, म्हणूनच वजन कमी करणे ही गोष्ट मला पटत नाही. वैयक्तिक आयुष्यातदेखील नेहमी सुंदर आणि ताजेतवाने राहण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. प्रियाचा गच्ची हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, तिचा हा साइज झीरो लूक कोणत्याही चित्रपटासाठी नसल्याचे प्रियाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Priya got the size zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.