प्रिया बापट झाली वजनदार

By Admin | Updated: January 23, 2016 02:46 IST2016-01-23T02:46:44+5:302016-01-23T02:46:44+5:30

प्रत्येक अभिनेत्रीच काय, प्रत्येक मुलगीदेखील आपल्या सौंदर्य व आरोग्याला जपत झिरो फिगर कशी राहील, याकडे बारकाईने लक्ष देत असते

Priya Bapat showed weighty | प्रिया बापट झाली वजनदार

प्रिया बापट झाली वजनदार

प्रत्येक अभिनेत्रीच काय, प्रत्येक मुलगीदेखील आपल्या सौंदर्य व आरोग्याला जपत झिरो फिगर कशी राहील, याकडे बारकाईने लक्ष देत असते. पण याच गोष्टीला प्रिया बापट अपवाद ठरली आहे. विचारात पडला ना नक्की काय झाले असेल? तर ऐका, सई ताम्हणकर व प्रिया बापट यांच्या वजनदार या नवीन चित्रपटाची नुकतीच शूटिंग चालू झाली असून, याच चित्रपटासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने चक्क एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा ते पंधरा किलो वजन वाढविले आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटातील अभिनेत्रीदेखील वजनदार झाल्याचे कळते. हीच गोष्ट मराठी चित्रपटांसाठी चांगली म्हणावी लागेल. कारण पूर्वी बॉलिवूडमध्ये योग्य भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्रींकडून लूक चेंज, स्टंट करणे, वजन वाढविणे या गोष्टी ऐकायला मिळायच्या. आता हाच बदल मराठी इंंंंंंंंडस्ट्रीमध्ये होताना दिसत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण योग्य भूमिकेला न्याय देण्यासाठी त्या भूमिकेत जावेच लागते नेमकी तीच गोष्ट या प्रिया बापटने केली.

Web Title: Priya Bapat showed weighty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.