रिमा लागूंना पंतप्रधान मोदी, बिग बींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 13:29 IST2017-05-18T12:55:55+5:302017-05-18T13:29:44+5:30

बॉलिवूडमधील ग्लॅमरस आई अभिनेत्री रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत बॉलिवूडमधील कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

Prime Minister Modi, Big Banshh and many people pay tribute to Rima | रिमा लागूंना पंतप्रधान मोदी, बिग बींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

रिमा लागूंना पंतप्रधान मोदी, बिग बींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 - बॉलिवूडमधील ग्लॅमरस आई अभिनेत्री रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी रात्री उशीरा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 
 
आज दुपारी 2 वाजता ओशिवरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रिमा लागू यांच्या जाण्यानं मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमा लागू यांच्या निधनासंदर्भात शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे. ""रिमा लागू उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. टीव्ही आणि सिनेमांच्या जगात त्यांनी आपला खोलवर ठसा उमटवला होता"", असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. 
महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन दुःख व्यक्त केले आहे. 
 
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रानंही ट्विट करत रिमा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ""रिमा लागू यांच्या जाण्यानं कला, सिनेमा जगताचं नुकसान झाले आहे.  तुम्ही ऑनस्क्रीनवरील आवडती आई म्हणून कायम राहणार आहात, असे ट्विट प्रियंकानं केले आहे. 

Web Title: Prime Minister Modi, Big Banshh and many people pay tribute to Rima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.