प्रेग्नंट सोहाला वहिनी करिना देतेय टिप्स!
By Admin | Updated: May 20, 2017 03:54 IST2017-05-20T03:54:36+5:302017-05-20T03:54:36+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करते आहे. सोहाला तिच्या प्रेग्नंसीसंबंधीच्या टिप्स दुसरे-तिसरे कोणी देत नसून तिची वहिनी करिना कपूर देतेय.

प्रेग्नंट सोहाला वहिनी करिना देतेय टिप्स!
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करते आहे. सोहाला तिच्या प्रेग्नंसीसंबंधीच्या टिप्स दुसरे-तिसरे कोणी देत नसून तिची वहिनी करिना कपूर देतेय. सोहा सांगतेय. ‘करिना मला न्युट्रिशनबाबत टिप्स देतेय. करिनाने मला सांगितले आहे, ‘प्रेग्नंसीदरम्यान कोणतेही डाएट करू नकोस. जे हवं असेल ते सगळं मनापासून खात जा.’ सोहाने ट्विट केले आहे, ‘येणाऱ्या नव्या पाहुण्याबाबत कुणाल आणि मी खूपच उत्सुक आहोत. आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. आता आयुष्याचे एक नवे पर्व सुरू होत आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्ही आणखी खूष झालो आहोत.’ सोहा पुढे लिहिते, ‘मी तशी नजर लागते या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. मी या बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ इच्छित नाही. तशीही मी आणि कुणाल आमचे पसर्नल लाइफ पर्सनल ठेवतो.’ सोहा आणि कुणालची ओळख ‘ढूँढते रह जाओगे’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर विवाहबंधनात अडकले.