पूजाने जपले सामाजिक भान!

By Admin | Updated: May 13, 2017 00:23 IST2017-05-13T00:23:38+5:302017-05-13T00:23:38+5:30

पूजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती, सतरंगी रे, दगडी चाळ’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच चित्रपटांतील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत

Poojaane stagnant social knowledge! | पूजाने जपले सामाजिक भान!

पूजाने जपले सामाजिक भान!

पूजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती, सतरंगी रे, दगडी चाळ’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच चित्रपटांतील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. आज एक अभिनेत्री म्हणून तिने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात अनिकेत विश्वासरावसोबत तिची केमिस्ट्री खूपच चांगली जुळून आली होती. तिच्या या चित्रपटाची चांगली चर्चादेखील झाली होती. पूजाला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. तिला कुत्र्यांविषयी तर खूप प्रेम आहे. रस्त्यांवरील कुत्र्यांविषयी तर तिला प्रचंड आपुलकी आहे. तिने आणि तिच्या बहिणीने आतापर्यंत रस्त्यावरील अनेक कुत्र्यांचा सांभाळ केला आहे. दादर-माहीम परिसरातील कुत्र्यांना या बहिणी अनेक वेळा डॉग फूड देतात. काही दिवसांपूर्वी तर तिने रस्त्यावरील एका कुत्र्याला चक्क घरी आणले होते. हे कुत्र्याचे पिलू पूजाच्या घरात चांगलेच रुळले आहे. प्राण्यांवर आधारित एक वेबसिरीज नुकतीच सुरू झाली असून या वेबसिरीजच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना पूजा आणि तिच्या भावाने आणलेल्या छोट्याशा कुत्र्याच्या पिलाची ही गोष्ट पाहायला मिळणार आहे.

Web Title: Poojaane stagnant social knowledge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.