पूजा बिरारीने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच घेतला बैलगाडा शर्यतीत भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:46 PM2024-05-02T12:46:35+5:302024-05-02T12:47:22+5:30

Yed Lagla Premacha : एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. मालिकेत बैलगाडा शर्यतीचा एक सीन पाहायला मिळणार आहे.

Pooja Birari took part in bullock cart race for the first time on the occasion of 'Yed Lagala Premach' | पूजा बिरारीने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच घेतला बैलगाडा शर्यतीत भाग

पूजा बिरारीने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच घेतला बैलगाडा शर्यतीत भाग

स्टार प्रवाह वाहिनीवर २७ मे पासून 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) ही नवीन मालिका दाखल होते आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र आहेत. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. मालिकेत बैलगाडा शर्यतीचा एक सीन पाहायला मिळणार आहे. मंजिरीला बैलगाडा शर्यतीत भाग घ्यावा लागतो. ही स्पर्धा ती जिंकते का याची उत्सुकता असेल. या सीनचे शूट पंढरपूरात पार पडले. दरम्यान आता अभिनेत्री पूजा बिरारी(Pooja Birari)ने शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगितले.

पूजा बिरारी म्हणाली की, बैलगाडी शर्यत शूट करायची ठरल्यापासून मनात खूप उत्सुकता होती. मी कधीच बैलगाडी चालवली नाहीये. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची खूपच उत्सुकता होती. पंढरपुरात आम्ही ही बैलगाडा शर्यत शूट केली. जवळपास ४ ते ६ दिवस या खास भागाचे शूट सुरु होते. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत आम्ही याच सीनवर मेहनत घेत होतो. मात्र टीममधल्या कुणाच्याही चेहऱ्यावर थकल्याचे भाव नव्हते. सीन अधिकाधिक चांगला कसा होईल याकडेच सर्वांचं लक्ष होते. बैलगाडी चालवणं हे मोठं आव्हान तर होतेच पण त्यासोबतच बैलांसोबत जुळवून घेणे म्हणजे तारेवरची कसरत होती. बैलगाडी नुसती चालवायची नव्हती तर ती शर्यतीत पळवायची होती. त्यामुळे खूप काळजी घेऊन शूट करावे लागत होते. आमच्या टीमने सर्वांचीच उत्तम सोय केली होती. 

दिग्दर्शकासोबतच बैलांच्या खऱ्या मालकांनी देखील मला बैलगाडी चालवण्याचे धडे दिले. मी हा सीन बॉडी डबलची मदत न घेता केला. शूटिंगच्या दिवशी सगळे गावकरी हा सीन पहाण्यासाठी जमले होते. खरतर खूपवेळा रिटेक्स झाले. मात्र आम्ही सर्वांनी हा सीन हताश न होता पूर्ण केला. मालिकेतला राया म्हणजेच अभिनेता विशाल निकमने या सीनसाठी मला खूप मदत केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बैलांसोबत मी हा सीन शूट केला त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांची मी नेहमी ऋणी असेन. माझ्यासाठी हा अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव होता. हा अनुभव माझ्या आठवणींच्या शिदोरीत कायम असेल. हा सीन स्क्रीनवर कसा दिसणार हे पहाण्यासाठी मी उत्सुक असल्याचे पूजा म्हणाली. 
 नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

Web Title: Pooja Birari took part in bullock cart race for the first time on the occasion of 'Yed Lagala Premach'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.