पूजा भट्ट बनणार ‘अल्कोहोलिक’!
By Admin | Updated: June 26, 2017 01:14 IST2017-06-26T01:14:19+5:302017-06-26T01:14:19+5:30
पूजा लवकरच एका चित्रपटात मद्याच्या अधीन गेलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसेल. पूजाचा हा चित्रपट अभीक

पूजा भट्ट बनणार ‘अल्कोहोलिक’!
पूजा लवकरच एका चित्रपटात मद्याच्या अधीन गेलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसेल. पूजाचा हा चित्रपट अभीक बरूआच्या ‘सिटी आॅफ डेथ’ या नॉवेलवर आधारित आहे. चालू वर्षाच्या अखेरिस या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. तूर्तास चित्रपटातील अन्य स्टारकास्ट ठरलेली नाही. पण पूजाची भूमिका पक्की आहे. काही दिवसांपूर्वी पूजा भट्ट ‘सडक’ चित्रपटाच्या सीक्वलमधून पुनरागमन करेल, अशी चर्चा होती. खुद्द पूजा या चित्रपटाबद्दल अतिशय उत्सूक आहे. ती याबद्दल भरभरून बोलली. माझे मित्र कौस्तव नारायण नियोगीने हे नॉवेल मला वाचायला दिले. हे वाचल्यानंतर मी यात एका व्यसनाधिन पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. ही भूमिका माझ्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांशी मिळतीजुळती आहे. मी दीर्घकाळ मद्याच्या आहारी गेले होते. पण आता मी मद्यसेवन कायमचे सोडले आहे. हा चित्रपट दिग्विजय सिंह दिग्दर्शित करणार आहेत.