प्रेक्षकांचा कल नाटकांकडे

By Admin | Updated: January 1, 2015 02:10 IST2015-01-01T02:10:14+5:302015-01-01T02:10:14+5:30

मधल्या काळात प्रेक्षकांच्या प्रायॉरिटीज बदलल्या होत्या. अग्रक्रम आता बदलला आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये एकेकाळी चित्रपटासारखेच नाटकाचेही दिवसाला तीन शो व्हायचे.

In the play of the audience tomorrow | प्रेक्षकांचा कल नाटकांकडे

प्रेक्षकांचा कल नाटकांकडे

मधल्या काळात प्रेक्षकांच्या प्रायॉरिटीज बदलल्या होत्या. अग्रक्रम आता बदलला आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये एकेकाळी चित्रपटासारखेच नाटकाचेही दिवसाला तीन शो व्हायचे. आता कॉर्पोरेट कल्चर आपल्याकडेही आले आहे. म्हणजे आठवड्याचे पाच दिवस काम करायचे आणि शनिवार, रविवार सुटी. त्यामुळे आता शनिवार व रविवारच्या दिवशी नाटकांना फार गर्दी होताना दिसते. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांनीही आवड्यातील पाच दिवस मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी आणि दोन दिवस नाटक, असे ठरवून दिले आहेत. त्यामुळेही बरेचसे वातावरण बदलले आहे.
आपल्याकडील मराठी इंडस्ट्री मर्यादित आहे. जी माणसे नाटकात असतात तीच सिनेमात आणि मालिकांमध्येही असतात. पण आता नवीनच्या नवीन पिढी निर्माण झाली आहे, जी मालिकांमधून आपल्याला पाहायला मिळते. पण जे सीनिअर कलावंत आहेत त्यांना अजूनही रंगभूमीची ओढ आहे. त्यांना अजूनही रंगभूमीविषयी प्रेम आहे. त्याचे रूपांतर प्रेक्षकांच्या आवडीत झाले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. हा एक नवीन प्रवाह मला २०१४ मध्ये दिसला. वीकेंड थिएटर असा ट्रेंड २०१५मध्ये सेट होईल, असे दिसून येते.
यामध्ये एक अडचण अशी आहे, ती म्हणजे नाट्यगृहाची संख्या फार आहे. त्याची प्रेक्षकसंख्याही फार मोठी आहे. जसे मल्टिप्लेक्समध्ये सिनेमासाठी काही ठिकाणी पंचाहत्तर, शंभर, दीडशे ते दोनशे अशा पद्धतीचा प्रेक्षकवर्ग मर्यादित केला. तसेच नाटकांसाठीही आयडियली पाचशे, सहाशे प्रेक्षकसंख्या असणारी नाट्यगृहे उभी राहिली पाहिजेत. नुकतेच पनवेलमध्ये महापालिकेने असे मोठे नाट्यगृह तयार केले आहे. अशा प्रकारची रचना असणारी नाट्यगृहे असली पाहिजेत, जेणेकरून अधिकाधिक प्रेक्षकांना नाटक पाहता येऊ शकेल.
या वर्षात आणखी एक चांगला बदल दिसून आला, तो म्हणजे झी टीव्ही नाटक आणि चित्रपटांचे मोफत प्रमोशनही करीत आहे. तसेच ते उत्तम मार्केटिंगही करीत आहे. ते स्वत: निर्मितीत उतरले असून एस्सेल व्हिजन निर्मिती संस्थेचा ‘दुनियादारी’, ‘लय भारी’, ‘प्रकाशवाटा’, ‘फँ ड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’ यासारखे चित्रपटही त्यांनी केले. हे लक्षण खूप चांगले आहे की त्यांनी केवळ धंदेवाईक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला नाही. उलट त्यांनी सर्व प्रकारचे चित्रपट घेण्याचा प्रयत्न करीत त्याच्या वितरणामध्ये, प्रसिद्धीमध्ये स्वत: सहभाग घेतला. झीप्रमाणेच इतर संस्थाही पुढे सरसावल्या पाहिजेत.
या सर्वात खेदाची गोष्ट झाली ती म्हणजे चित्रपटाचे टॉकीजमधले आयुष्य फार कमी झाले आहे. पूर्वीच्या काळी सरसकट सर्व सिनेमांची सिल्व्हर ज्युबिली व्हायची, थिएटरमध्ये तशी वेळ आता राहिली नाही. प्रेक्षकवर्ग मोठा असूनसुद्धा ‘प्रकाशवाटा’चे १० ते १२ आठवडे झाले चित्रपटगृहात. मात्र टेलीव्हिजनवरूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो चित्रपट पोहोचला. हे महत्त्वाचे बदल मला सध्या दिसत आहेत.
मराठी सिनेमाला व्यावसायिकतासुद्धा आहे. त्यामुळे रिकव्हरीची शक्यताही अधिक आहे, असाही संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहे. तसेच सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी चित्रपट तयार होत आहेत. काही प्रेक्षकांना अभिरुची असलेले केवळ मनोरंजन नाही तर त्याबरोबर अधिक काही असणारे चित्रपट, सामाजिक संदेश देणारे चित्रपट, तर काही फक्त मनोरंजक असे सिनेमेही आहेत. टेक्निकलदृष्ट्याही आपण सजग होत आहोत. मात्र नाटकात याउलट होत आहे. येथे नवीन लिखाण होत नाही.
जुन्या अभिजात नाटकांना पुन्हा बरे दिवस आले आहेत. लेखकांची मधली पिढी विविध व्यापात अडकली आहे. काही चित्रपटांत तर काही मालिकांमध्ये अडकल्यामुळे नाटकाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नवीन विषयाची नाटके हल्ली येत नाहीत. १९९० ते २०१० साल या दरम्यानच्या काळातील नवनवीन नाटकांचा रेटा आता कमी झाला आहे. त्यामानाने फार कमी अशी दर्जेदार नाटकं येत आहेत.
वीकेंड थिएटरचा एक फटका असाही आहे, तो म्हणजे मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणात प्रयोग करणे कठीण होते त्या वेळी उर्वरित महाराष्ट्रात पोहोचताना अडचण होते. मुख्य शहरांतच आपण पूर्णपणे पोहोचलो नाहीत तर इतर ठिकाणी कसे जाणार याचीच भीती नाटकाच्या दिग्दर्शक, निर्मात्यांना असते. त्यामुळे नाटकांचे प्रयोग फार कमी झालेत.
टेलीव्हिजननेही रंगभूमीला प्रसिद्धी देण्याचे, त्याला पोषक असे कार्यक्रम सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पद्धतीनेच आणखी काही करता येण्यासारखे आहे का, तेही पाहिले पाहिजे. माझे स्वत:चे असे मत आहे की, त्यानंतरच तो टीव्हीवर दाखवण्यात आला पाहिजे.
(शब्दांकन : सायली कडू)

आणखी एक चांगला बदल दिसून आला तो म्हणजे झी टिव्ही नाटक आणि चित्रपटांचे मोफत प्रमोशनही करत आहेत. उत्तम मार्केटिंग व निर्मितीत उतरले असून एस्सेल व्हिजन निर्मिती संस्थेचा ‘दुनियादारी’, ‘लय भारी’, ‘प्रकाशवाटा’, ‘फॅँण्ड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’ यासारखे चित्रपटही त्यांनी केले. हे लक्षण खुप चांगले आहे .

मराठीत चित्रपटांची संख्या अधिक आणि कमाई अशी मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की प्रत्येक महिन्यात एक मोठा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचबरोबरीने एक लहान चित्रपटही आला . मात्र याचा एक फायदा असा झाला तो म्हणजे अर्थहिन असे चित्रपट कमी झाले.

तरुणांची संवेदनशीलता सारखीच आहे. मग तो शहरातील असो वा खेड्यातील, सर्वांकडेच इंटरनेट, मोबाईल पोचला आहे. तरीही रंगभूमीच्या किंवा चित्रपट निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान किंवा त्याची संवेदना की कशाप्रकारे केले गेले पाहिजे, याचा पूल अजून बांधला जात नसल्याचे सद्यस्थितीत पाहायला मिळत आहेत.

टेलिव्हीजननेही रंगभूमीला प्रसिद्धी देण्याचे, त्याला पोषक असे कार्यक्रम सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पद्धतीनेच आणखी काही करता आले पाहीजे. माझे स्वत:चे असे मत आहे की, चित्रपटांची चित्रपटगृहातील क्षमता अधिक वाढवली गेली पाहिजे. त्यानंतरच तो टिव्हीवर दाखवण्यात आला पाहिजे.

देशातील व राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचाही परिणाम येथे दिसून येतो. सध्या सुरू असलेली ‘पीके’ चित्रपटाची चर्चा, स्वयंघोषित सेन्सॉरशिप याचे प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता आहे. राजकीय प्रभावाखाली येऊन केलेल्या या कृतींचा दुष्परिणाम या क्षेत्रावर होत आहे.

- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

Web Title: In the play of the audience tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.