कुठं गायब झाली 'पापा कहते हैं' फेम अभिनेत्री?, आता ओळखणं झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 20:20 IST2022-10-10T20:16:10+5:302022-10-10T20:20:44+5:30
Bollywood Actress: 'पापा कहते हैं' चित्रपटात आपल्या निरागसता आणि सौंदर्याने लोकांच्या अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीने कमी कालावधीत बॉलिवूडला रामराम ठोकला.

मयुरी कांगो तिचा दुसरा चित्रपट पापा कहते हैंमधून लोकप्रिय झाली. या चित्रपटात ती अभिनेता युगल हंसराज सोबत झळकली होती. जो त्या काळातील चॉकलेटी अभिनेत्यांपैकी एक होता. त्या काळात सलमान खान, शाहरुख खानपेक्षाही जास्त मुली त्याच्यावर फिदा असायच्या. चित्रपटातील या चॉकलेटी हिरोसोबत मयुरी कांगोची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती.
त्यांच्यावर खास चित्रित केलेले 'पहेले प्यार का पहला गम है' हे गाणे त्यावेळी प्रचंड गाजले होते. मयुरी कांगो आणि जुगल हंसराज यांचा 'पापा कहते हैं' हा चित्रपट 1996 साली आला होता.
या चित्रपटापूर्वी मयुरी 1995 मध्ये आलेल्या नसीम या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातून त्याने पदार्पण केले.
मयुरीने जवळपास १० वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केले, यादरम्यान तिला खूप प्रसिद्धीही मिळाली.
जेव्हा तिला या करिअरमध्ये समाधानी वाटत नव्हते तेव्हा तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर २००५ मध्ये मयुरी एमबीए करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली आणि तिचे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मयुरीने 360i सह मार्केटिंग क्षेत्रात असोसिएट मीडिया मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
८ वर्षानंतर ती भारतात परतली आणि आपल्या कुटुंबासह गुरुग्राममध्ये स्थायिक झाली. आता मयुरी गुगल इंडियामध्ये सीईओ म्हणून काम करत आहे.