Tiger shroff : क्या बात है भिडू! टायगर श्रॉफचं 8BHK आलिशान घर पाहिलंत का? कुटुंबातील प्रत्येकाला दिलीय स्वतंत्र स्पेस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:12 PM2023-03-02T12:12:29+5:302023-03-02T12:34:56+5:30

मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं पूर्ण झालं आहे.

टायगर श्रॉफने कमीवेळात बॉलिवूड आपली ओळख निर्माण केली आहे. यशाच्या शिड्या चढत असताना टायगर आता एका आलिशान घराचा मालकसुद्धा झाला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

जॅकी श्रॉफचा लेक टायगर श्रॉफनं काही महिन्यांपूर्वी मुंबईत एक लग्झरी घर खरेदी केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

टायगर श्रॉफने खार वेस्ट येथील रुस्तमजी पॅरामाउंट येथे त्यानं घर घेतलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

टायगच्या या 8 बीएचके घरातून अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.(फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेत्याच्या घराची ही लिव्हिंग रूम आहे. जे खूप मोठे आणि सुंदर आहे. त्यात ऑफ व्हाइट सोफे बसवण्यात आले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)

या घराचा कोपरा न कोपरा शानदार आहे. अगदी फाईव्ह स्टार हॉटेलसारखा लुक असलेले हे घर अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

जिम आहे, गेस्ट रूम आहे, स्वीमिंग पूल, आर्टिफिशिअल रॉक क्लायम्बिंगसारख्या अनेक गोष्टी आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

श्रॉफ कुटुंब पूर्वी कार्टर रोड येथील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायचं. (फोटो इन्स्टाग्राम)