No Kissing पॉलिसीवर अभिनेत्रीचा खुलासा, 'जवान' फेम प्रियामणीला आवडत नाही इंटिमेट सीन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:06 AM2023-12-18T11:06:03+5:302023-12-18T11:11:23+5:30

हल्ली बॉलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीन देणं ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. इतकंच नाही तर अलीकडेच तृप्ती डिमरी हिने रणबीर कपूरसोबत त्यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात इंटिमेट सीन दिला होता आणि त्यानंतर ती चर्चेतही आली होती. पण इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आधीच नो किसिंग, नो इंटिमेट सीनचा करार केला आहे.

हल्ली बॉलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीन देणं ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. इतकंच नाही तर अलीकडेच तृप्ती डिमरी हिने रणबीर कपूरसोबत त्यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात इंटिमेट सीन दिला होता आणि त्यानंतर ती चर्चेतही आली होती. पण इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आधीच नो किसिंग, नो इंटिमेट सीनचा करार केला आहे. या यादीत जवान फेम अभिनेत्री प्रियामणीचाही समावेश आहे.

प्रियामणी जवान या चित्रपटात ही अभिनेत्री शाहरुख खानसोबत दिसली होती. तिचा जन्म ४ जून १९८४ रोजी बंगळुरू येथे झाला. ती ३९ वर्षांची आहे आणि तिचे वडील व्यापारी आहेत आणि तिची आई बॅडमिंटन खेळाडू आहे. बंगळुरूत तिने तिचे शिक्षण पूर्ण केले.

प्रियामणी १२वीत असताना दिग्दर्शक भारतीय राजाने तिला चित्रपटात येण्यासाठी प्रेरित केले. या अभिनेत्रीला लहानपणापासूनच कलेच्या जगात खूप रस होता. प्रियामणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.

प्रियामणीने २००३ मध्ये इवारे अटागाडू या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश केला आणि अलीकडेच ती जवानच्या प्रमोशनदरम्यान देखील दिसली. खरं तर, प्रमोशन दरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला नो किसिंग पॉलिसीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने याबद्दल खुलेपणाने सांगितले. २०१७ मध्ये तिने मुस्तफा राजसोबत लग्न केले.

प्रियामनीने असेही सांगितले की, माझ्याकडे काही प्रोजेक्ट्स होते ज्यात इंटिमेट सीन होते पण मी त्यांना नकार दिला होता. कारण असे सीन्स करण्यात मला कंफर्टेबल वाटत नाही. पडद्यावर फक्त गालावर चुंबन घेणे ठीक आहे, पण लिप किस करणे खूप विचित्र वाटते. पडद्यावर अनोळखी व्यक्तीसोबत लव्ह मेकिंग सीन करणे खूप अस्वस्थ करण्यासारखे आहे.

प्रियामणी पुढे म्हणाली, "मी नो किसिंग नो इंटिमेट सीन पॉलिसीवर विश्वास ठेवते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मी विवाहित आहे आणि कोणाची तरी पत्नी आहे.

माझ्या कुटुंबाप्रतीही माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. कुटुंबातील सदस्यही माझे चित्रपट पाहतात. त्यामुळेच त्यांनाही माझ्या कोणत्याही सीनवर आक्षेप वाटू शकतो. म्हणूनच अशा सीनपासून दूर राहणे ही माझी स्वतःची निवड आहे, असे प्रियामणी म्हणाली.