'मैं खिलाडी तू अनाडी'मधील सैफची नायिका रागेश्वरी आता दिसते अशी, लेटेस्ट फोटोत ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:17 IST2025-07-16T19:12:52+5:302025-07-16T19:17:29+5:30

बॉलिवूडच्या जगात अनेकांनी आपले नाव कमावले पण काही जण असे होते ज्यांनी लोकप्रियता मिळवूनही इंडस्ट्रीला अलविदा म्हटले. यामधील एक नाव म्हणजे रागेश्वरी लुंबा. जिने एकेकाळी अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका केली होती तर कधी चंकी पांडेची प्रेयसी बनली होती.

बॉलिवूडच्या जगात अनेकांनी आपले नाव कमावले पण काही जण असे होते ज्यांनी लोकप्रियता मिळवूनही इंडस्ट्रीला अलविदा म्हटले. यामधील एक नाव म्हणजे रागेश्वरी लुंबा. जिने एकेकाळी अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका केली होती तर कधी चंकी पांडेची प्रेयसी बनली होती.

बॉलिवूड अभिनेत्री रागेश्वरी लुंबा ९० च्या दशकातील चित्रपटांमध्ये दिसली होती. तिने गोविंदा, चंकी पांडे, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रुपेरी पडद्यावर काम केले आहे. मात्र, सध्या ती सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

रागेश्वरी लुंबा हिने १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आँखें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यात ती चंकी पांडेसोबत दिसली होती. गोविंदाही त्यात होता.

त्यानंतर रागेश्वरीने 'मुंबई से आया', 'तुम जिओ हजारों साल', 'दिल कितना नादान है', 'मैं खिलाडी तू अनाडी' आणि 'झिद' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रागेश्वरीने मॉडेलिंग आणि गायनापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिने सुनील शेट्टी आणि सैफ अली खान सारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले. पण नंतर तिने इंडस्ट्री सोडली आणि यामागील कारण तिच्या आरोग्याच्या समस्या होत्या.

खरेतर, रागेश्वरीला बेल्स पाल्सी असल्याचे निदान झाले, ज्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ते वर्ष २००० होते. जेव्हा ती एका म्युझिक व्हिडीओवर काम करत होती. त्याच वर्षी तो लाँच झाला आणि एका आठवड्यानंतर अभिनेत्रीला या आजाराची माहिती मिळाली.

रागेश्वरीच्या चेहऱ्याच्या डावा भागाला अर्धांगवायू झाला. तिच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत झाले होते. आणि या कारणास्तव तिला गायन सोडावे लागले. ती ४ वर्षे अंथरुणाला खिळून राहिली. जरी तिने 'बिग बॉस सीझन ५' मध्ये देखील भाग घेतला होता पण काही दिवसांनी तिला बाहेर काढण्यात आले.

अशा परिस्थितीत रागेश्वरीलाही अभिनय सोडावा लागला. बॉलिवूडमधील तिची कारकीर्द अचानक संपली आणि तिने अभिनयातून निवृत्ती घेतली. मात्र, तिने बरे होण्यासाठी मेडिटेशन, फिजिओथेरपी घेतली.

रागेश्वरी आता तिच्या पती आणि मुलीसह इंग्लंडमध्ये राहते. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिथे ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिने २०१४ मध्ये ह्यूमन राइट्सचे वकील सुधांशू स्वरूप केसी यांच्याशी लग्न केले आणि २०१६ मध्ये तिला एका मुलीला जन्म दिला.