रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:09 IST2025-07-13T18:04:09+5:302025-07-13T18:09:58+5:30
रिंकूचा हा स्टनिंग लूक तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट' (Sairat) या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली.
रिंकू सध्या सोशल मीडियावर रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे हे फोटो पाहून चाहतेही कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.
नुकतेच निळ्या-पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समधील फोटो रिंकूने शेअर केलेत.
या फोटोला "ME, MYSELF AND I" असं कॅप्शनही दिल्याचं पाहायला मिळतंय.
या लूकमध्ये तिने एक ब्लॅक अँड व्हाइट फोटोदेखील पोस्ट केला. अभिनेत्रीने गॅलरीत हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोमधून तिनं चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतलाय असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही.
रिंकू ट्रेडिशनल लूकमध्ये जितकी सुंदर दिसते तितकाचा तिला वेस्टर्न लूकही भारी दिसतो.
अगदी काही दिवसांपुर्वीच रिंकूचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला होता. यंदाच्या वारीत रिंकू सहभागी झाली होती.
हिरवी नऊवारी साडी, नथ, केसात गजरा अशा पारंपरिक पेहरावात ती दिसली होती.
रिंकूनं अनेक सिनेमामध्ये काम करुन विशेष नाव कमावले आहे. आता चाहत्यांना तिच्या नव्या प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे.