पहिला चित्रपट अन् मोठा धक्का! अचानक दिसणं झालं बंद; 'ही' अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:05 IST2022-10-21T12:51:54+5:302022-10-21T13:05:47+5:30
Iman Ali : अगदी फिट आणि फाईन वाटणारी इमान अली एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. फारच कमी लोकांना हे माहीत आहे.

जेव्हा स्टार्स पडद्यावर येतात तेव्हा लोक फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे, शैलीकडे बघत राहतात, पण या काळात त्यांनी सहन केलेल्या दुःखाची कल्पना कोणालाच येत नाही. कधीकधी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री हे गंभीर समस्यांशी झुंज देत असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे इमान अली, जी पाकिस्तानातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
अगदी फिट आणि फाईन वाटणारी इमान अली एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. फारच कमी लोकांना हे माहीत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'खुदा के लिए' या पाकिस्तानी चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या इमानचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.
पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला अचानक दिसणं बंद झालं होतं, हे फार क्वचित लोकांना माहीत आहे. या घटनेचा उल्लेख तिने तिच्या एका मुलाखतीत आता केला आहे. पहिल्याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एवढ्या मोठ्या धक्क्याची कल्पनाही कोणी केली नसेल.
जेव्हा इमानची चाचणी घेण्यात आली तेव्हा तिला समजले की ती मल्टीपल स्क्लेरोसिस नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. तिच्यासाठी हा मोठा धक्का होता. मात्र तिने आपल्या भीतीवर मात करत आपलं काम पुढे करण्याचा निर्णय घेतला. या आजाराला तोंड देत अभिनेत्रीने चित्रपटाचे शूटिंग सुरू ठेवले आणि पुढेही काम सुरू ठेवले.
मल्टीपल स्क्लेरोसिस या आजारात एका बाजुने दिसणं बंद होतं, झोप पूर्ण झाली तरी खूप थकवा जाणवतो आणि शरीर थंड पडतं. या आजाराशिवाय इमान लहानपणापासूनच नाकाशी संबंधित आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळे तिला बोलण्यातही त्रास होत होता. अनेक वेळा लोकांना वाटलं की ती नशेत आहे.
इमाननेही आपल्या मुलाखतीत या आजाराविषयी सांगितलं. इमान अलीने हार मानली नाही. या आजाराशी लढा देत असताना, अभिनेत्रीने सतत तिच्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आणि आपले करियर उंचीवर नेलं. आज ती तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन आनंदाने जगत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - सोशल मीडिया)