Ved Movie : खुशीचं काम पाहून रितेशनंच बदललं तिचं नाव, 'वेड'मधला हा किस्सा तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:36 PM2023-01-17T13:36:33+5:302023-01-17T13:43:31+5:30

Ved Marathi Movie : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या वेड चित्रपट लवकरच ५० कोटींचा आकडा पार करणार आहे. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त बालकलाकार खुशी हजारे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. रविवारी वेडने २.७४ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४७.६६ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करणार आहे.

रितेश आणि जेनेलिया जेवढे या चित्रपटात यशस्वी ठरले तेवढेच सहाय्यक कलाकार सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे अशोक सराफ, जिया शंकर यांचेही मोठे कौतुक झाले.

यासोबतच बालकलाकार खुशी हजारे हिच्या सुद्धा अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. खरेतर खुशीचा येण्याने सत्या आणि श्रावणीचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्यामुळे खुशी त्या दोघांमधला दुवा ठरली होती.

खुशी हजारे ही बालकलाकार झळकली. तिने वेड चित्रपटात खुशीचे पात्र निभावले आहे. खरेतर या चित्रपटात तिच्या पात्राचे नाव मीरा असे होते. मात्र पहिल्याच दिवशी खुशीने तिच्या अभिनयाने रितेशचे मन जिंकून घेतले होते.

चित्रपटातला हा खास किस्सा असा होता की, चित्रपटाचे शूटिंग चालू झाले तेव्हा खुशी मीराचे पात्र साकारत होती. मात्र तिसऱ्या दिवशी जेव्हा डी वाय पाटीलच्या स्टेडियमवर खुशीची एन्ट्री झाली.

तेव्हा रितेशने तिचा सीन समजावून सांगितला. तू माझ्याकडे रागाने बघ, चालत ये आणि हेल्मेट काढ. खुशीने हा सीन वन टेकमध्ये केला आणि इथेच तिने रितेशचे मन जिंकून घेतले. रितेश एवढा खूश झाला की त्याने तिचे चित्रपटातील नाव बदलून खुशी ठेवले.

त्यानंतर मात्र सेटवर रितेश आणि जिनिलिया खुशी सोबत आपल्या मुलीप्रमाणेच वागत असत. ते तिला आपली मुलगीच मानत. अशा प्रकारे खुशीने सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले मात्र चित्रपटात सुद्धा तिने केलेल्या भूमिकेने वाहवा मिळवली आहे.

या लहान मुलीच्या येण्यानेच चित्रपटाला खरा ट्विस्ट येतो. या मुलीमुळेच सत्या आणि श्रावणी एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे ही भूमिका चित्रपटात खूप महत्वाची मानली जाते.

खुशी हजारेने हिंदी मराठी चित्रपटातून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेले आहे.

वजनदार, प्रवास, सरबजीत, भूत, आपडी थापडी अशा चित्रपटातून तिला विकी कौशल, ऐश्वर्या राय, श्रेयस तळपदे, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे, सई ताम्हणकर या मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याची संधी मिळाली.

बॉलिवूड आणि मराठी अशी जवळपास १३ चित्रपटात तिने भूमिका केल्या आहेत.