सुटला माझा पदर बाई... सोनाली कुलकर्णीचं समुद्रकिनारी फोटोशूट, एकापेक्षा एक हॉट पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:50 IST2025-02-23T10:45:42+5:302025-02-23T10:50:11+5:30

सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) कायम चर्चेत असते. नुकतेच तिचे नवे फोटोशूट केले आहे.

अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. साडीतील काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

सोनाली तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. या फोटोंमध्येही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

दुबईतील समुद्राच्या रुपेरी वाळूवर तिने हे फोटोशूट (Sonalee Kulkarni Photoshoot At Kite Beach Dubai) केलं आहे.

फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "वो सर्दियों की धूप की तरह गुरूब हो गया, लिपट रही है याद जिस्म से लिहाफ़ की तरह….".

पिवळ्या रंगाची गुलाबाच्या फुलांचं डिझाईन असेलली साडी, त्यावर न्यूड मेकअप असा आपला लुक तिने पुर्ण केला.

यावेळी सोनालीच्या झुमक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने यावेळी साडीला साजेसे झुमके घालणे पसंत केले.

फोटोसाठी सोनालीने खास बोल्ड पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे

तिच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये सोनाली अतिशय सिंपल पण तितकीच हॉट दिसत आहे.

सोनालीचं सौंदर्य असे आहे की तिच्या सौंदर्याची स्तुती करताना जणू शब्दच कमी पडतात.

सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.