अपघातात पतीचा मृत्यू, ३५ व्या वर्षी मुलाचंही निधन; वाईट काळावर मात करुन आज प्रसिद्ध मराठी गायिका

By देवेंद्र जाधव | Updated: August 7, 2025 17:34 IST2025-08-07T17:17:11+5:302025-08-07T17:34:27+5:30

मराठी गाणी गाऊन या गायिकेने सर्वांच्या मनात स्थान मिळवलंय. परंतु वैयक्तिक आयुष्यातील मोठे धक्के या गायिकेला सहन करावे लागले

अपघातात पतीचं निधन झालं. पुढे किडनी फेल झाल्याने मुलगाही गमावला. मानसिकरित्या खचलेली ही गायिका आज आयुष्यात अनेक संघर्ष बघूनही स्वतःच्या पायांवर ठाम उभी आहे

ही गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. अनुराधा या मराठी आणि बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका. कायम हसतमुख असणाऱ्या अनुराधा यांनी वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप दुःख सहन केलंय

अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. कर्नाटकातील कारवार कुटुुंबात अनुराधा यांचा जन्म झाला.

अनुराधा यांनी गायनाचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नाही. लता मंगेशकर, आशा भोसलेंचा आवाज ऐकून त्या रियाज करायच्या.

अनुराधा यांनी १९६९ साली अरुण पौडवाल यांच्याशी लग्न केलं. पतीचं प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच त्यांचा इंडस्ट्रीत प्रवेश झाला. परंतु १९९१ साली एका अपघताता अरुण यांचा मृत्यू झाला

पतीच्या निधनामुळे अनुराधा मानसिकरित्या खूप खचल्या होत्या. परंतु तरीही त्यांनी संगीत आणि गायनक्षेत्रातील आपला प्रवास चालूच ठेवला.

सर्व सुरळित चालू असताना २०२० साली किडनी फेल झाल्याने अनुराधा यांच्या मुलाचं अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झालं. अशाप्रकारे अनुराधा यांनी वैयक्तिक आयुष्यात खूप दुःख भोगलंय