परी म्हणू की सुंदरा? सईचे ग्लॅमरस लूकमधील फोटो चर्चेत, टॅटूने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 06:45 PM2024-06-01T18:45:30+5:302024-06-01T18:50:02+5:30

सईने गुलाबी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे. ग्लॅमरस लूक करत सईने खास पोझही दिल्या आहेत.

बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा चेहरा म्हणजे सई ताम्हणकर. मराठीबरोबरच सईने बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप पाडली.

सईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सईचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. तिच्या फॅशनची नेहमीच चर्चा होताना दिसते.

आतादेखील सईच्या अशाच काही फोटोंची चर्चा रंगली आहे. सईने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यामध्ये सईने गुलाबी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे.

ग्लॅमरस लूक करत सईने खास पोझही दिल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

सईच्या या फोटोमधील तिच्या मानेवरील आणि हातावरील टॅटूने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे.