बाबा रे बाबा...! मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय मराठी चित्रपटसृष्टीतील हा ‘चॉकलेट बॉय’, फोटो तर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:20 IST2022-04-15T18:09:57+5:302022-04-15T18:20:28+5:30

Siddharth Menon: सिद्धार्थने मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चॉकलेट बॉयच्या या फोटोंवर तुम्ही सुद्धा फिदा व्हाल.

अभिनेता सिद्धार्थ मेनन. एक गुणी अभिनेता. त्याची ओळख करून देण्याची गरज नाहीच.

सगळे त्याला ओळखतात ते मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून. या चॉकलेट बॉयचे ताजे फोटो पाहाल तर पाहातच राहाल.

सध्या हा चॉकलेट बॉय धम्माल करतोय. होय, मालदीवमध्ये तो सुट्टयांचा आनंद घेत आहे.

मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चॉकलेट बॉयच्या या फोटोंवर तुम्ही सुद्धा फिदा व्हाल.

चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. मराठी सेलिब्रिटींनीही त्याच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

चाहत्यांच्या कमेंट्स तर विचारू नका. गर्मी, बाबा रे बाबा...,गजब, सुपर सेक्सी अशा कमेंट्स करत चाहत्यांनी त्याच्या या फोटोंचं कौतुक केलं आहे.

एकुलती एक या चित्रपटातून सिद्धार्थने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर तो अनेक चित्रपटात झळकला.

हॅपी जर्नी, स्लॅमबुक, राजवाडे अ‍ॅण्ड सन्स, अँड जरा हटके अशा अनेक मराठी चित्रपटात तो झळकला.