'मला वेड लागले प्रेमाचे..'! साखरपुड्यानंतर क्षितीजा-प्रथमेश झाले रोमॅण्टिक; फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 01:49 PM2024-02-15T13:49:08+5:302024-02-15T13:53:52+5:30

Prathamesh parab: क्षितीजाने साखरपुड्यानंतर त्यांचे काही रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब याने नुकताच क्षितीजा घोसाळकर हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.

या साखरपुडा समारंभाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रथमेश आणि क्षितीजाने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत साखरपुडा केला.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा हा कार्यक्रम पार पडला.

क्षितीजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिने साखरपुडा झाल्यानंतर काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

प्रथमेश आणि क्षितीजा यांचे रोमॅण्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. या फोटोमध्ये ही जोडी कमालीची सुंदर दिसत आहे.

क्षितीजा आणि प्रथमेश या दोघांनीही लाइट पिंक रंगाचे डिझायनर कपडे परिधान केले आहेत.

या जोडीने त्यांची एंग्जेमेंट रिंग फ्लॉण्ट केली आहे.