PHOTOS : सह्याद्रीचं सुख शब्दांत मांडता येत नाही..., आकाश ठोसरने शेअर केलेत सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:11 IST2022-04-20T17:21:20+5:302022-04-21T13:11:13+5:30
Akash Thosar : अभिनेता आकाश ठोसर सध्या काय करतोय, तर मस्तपैकी सैर करतोय. गडकिल्ल्यांना भेट देत, सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यांत साठवतोय.

अभिनेता आकाश ठोसर सध्या काय करतोय, तर मस्तपैकी सैर करतोय. गडकिल्ल्यांना भेट देत, सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यांत साठवतोय.
होय, आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात आकाश राजगड व सह्याद्रीचा सुंदर परिसर पाहायला मिळतो आहे.
या फोटोंमध्ये अभिनेता किल्ले राजगडचं दर्शन घेताना दिसून येत आहे. राजगडाच्या प्रसन्न वातावरणात आकाश अगदी हारवून गेल्याचं दिसत आहे.
आकाश ठोसरने राजगडावरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये राजगडचा सुंदर परिसर पाहायला मिळत आहे.
आकाश ठोसरने नुकतंच राजगड किल्ल्याला भेट दिली. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. फोटोंपेक्षाही या फोटोना आकाशने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे.
सह्याद्रीचं सुख शब्दांत मांडता येत नाही तर ते प्रत्यक्षात अनुभवावच लागतं, असं त्याने लिहिलं आहे.
आकाशने राजगडाचे काही फोटो शेअर केले आहेत. गडांचा राजा, राजियांचा गड... किल्ले राजगड, अशा कॅप्शनसह त्याने हे फोटो शेअर केले आहेत.
आकाशने शेअर केलेले हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. काहीच तासांत हजारो चाहत्यांनी या फोटोंना लाईक केलं आहे.