Sai Tamhankar : 'खरं स्ट्रगल तो करतोय'! अभिनेत्री सई ताम्हणकर 'त्या' फोटोमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 07:00 AM2022-11-11T07:00:00+5:302022-11-11T07:00:06+5:30

Sai Tamhankar : सईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीय.

सई ताम्हणकर ( Sai Tamhankar) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. (फोटो इन्स्टाग्राम)

मराठीसोबतच हिंदी सिनेमांत आपली स्वत:ची ओळख निर्माण करणारी सई चाहत्यांची लाडकी अभिनेत्री. सई लवकर इम्रान हाश्मीसोबत ‘ग्राऊंड झिरो’ या सिनेमात झळकणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत सईने अनेक खुलासे केलेत. अगदी पर्सनल लाईफबद्दलही ती बोलली. यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सईचा मिमीनंतर 'इंडिया लॉकडाऊन' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सिनेमात जगात आलेल्या कोरोना महामारीमुळे करावा लागलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर भाष्य करणार असल्याचं समोर आलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या सिनेमातील शूटिंगदरम्यानचा एका फोटो सईनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

फोटोमध्ये दिसणाऱ्या हातगाडीवर सई झोपली आहे. तर त्यांच्या टीममधला एक माणूस तिला ऊन लागू नये म्हणून छत्री पकडून उभा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

“हाच खरा स्ट्रगल... जेव्हा आम्ही सेटपासून दूर असलेल्या ठिकाणी शूटिंग करत होतो. आम्ही परिस्थितीशी जुळवून घेत काम केलं. असे कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. यानंतर तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

माणूस छत्री पकडून थांबलाय आणि कसला struggl, छत्री वाल्याला सांगा कोरोना गेला म्हणून , बिचारा स्ट्रगल करतोय, तो छत्रीवाला खरा उन्हात उभा आहे', 'तू निवांत आहेस, पण छत्रीवाला खरा स्ट्रगल करतोय'. (फोटो इन्स्टाग्राम)

इंडिया लॉकडाऊन या सिनेमाचं दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलं आहे. सिनेमात प्रतीक बब्बर, प्रकाश बेलवडी, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमराहे हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)