UFFF! आपकी अदा सबसे जुदा..., ऐश्वर्या नारकरांचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:02 IST2022-04-29T17:56:22+5:302022-04-29T18:02:46+5:30
Aishwarya Narkar Photos : साडीमध्ये ऐश्वर्या कमालीच्या सुंदर दिसतात. पण वेस्टर्न लुकमधील त्यांचे फोटोही लक्ष वेधून घेतात.

मराठी कलाविश्वातील ‘एव्हरग्रीन ब्युटी’ म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्यावर सगळेच फिदा आहेत.
पन्नाशी ओलांडलेल्या ऐश्वर्या नारकर यांचे ताजे फोटो पाहाल तर पाहातच राहाल. तरूणींनाही लाजवेल असे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय असणा-या ऐश्वर्या स्वत:चे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या त्यांनी साडीतील काही ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.
काही फोटोत त्या मॉडर्न लुकमध्ये आहेत तर काही फोटोत त्यांनी साडी नेसून पोझ दिल्या आहेत. त्यांचे हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
५१ वर्षीय ऐश्वर्या यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून वय हा केवळ आकडा आहे,अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
अनेकांनी सुंदर, अप्रतिम अशा कमेंट्स करत ऐश्वर्यांच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आपकी अदा सबसे जुदा, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
साडीमध्ये ऐश्वर्या कमालीच्या सुंदर दिसतात. पण वेस्टर्न लुकमधील त्यांचे फोटोही लक्ष वेधून घेतात.
ऐश्वर्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अपराध, धड़क, अंकगणित या व अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे