जाणून घ्या अभिनेता रितेश देशमुखच्या 'लय भारी' कुटुंबाबाबत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-28T06:54:12+5:302018-06-27T20:10:26+5:30

अभिनेता रितेश देशमुखने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत रितेशने आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. तुझे मेरी कसम या सिनेमापासून ते बँन्जोपर्यंत रितेशनं आपल्या 'लय भारी' भूमिकांनी रसिकांवर जादू केली आहे. अभिनेत्री जेनिलिया डिसुझासह रितेश रेशीमगाठीत अडकला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या रितेश आपल्या कुटुंबासह असा घालवतो क्वॉलिटी टाईम.