रूटीन लाइफमध्ये परतली जान्हवी कपूर; पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-14T16:07:39+5:302018-06-27T19:54:50+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर हळूहळू त्यांचा परिवार या दु:खातून सावरताना बघावयास मिळत आहे. वास्तविक अजुनही परिवारातील लोकांना हे दु:ख स्विकारणे अवघड होत आहे. याचदरम्यान श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर आपल्या रूटीन लाइफमध्ये परतल्याचे दिसून आले. गेल्या मंगळवारी दुपारच्या दरम्यान ती नियमित वर्क आउट करण्यासाठी जीममध्ये जाताना स्पॉट झाली.