Oscar 2024 : ऑस्कर सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्रीने केली प्रेग्नन्सीची घोषणा; रेड कार्पेटवर फ्लाँट केला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:48 PM2024-03-11T12:48:38+5:302024-03-11T13:02:26+5:30

96th Academy Awards : पुरस्कारांबरोबरच ऑस्कर सोहळ्यातील रेड कार्पेटही चर्चेचा विषय असतो. याच रेड कार्पेटवर प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचा बेबी बंप फ्लाँट केला.

मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ९६वा अकादमी पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना विविध श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. या सोहळ्याला कलाविश्वातील दिग्गज हजेरी लावतात.

पुरस्कारांबरोबरच ऑस्कर सोहळ्यातील रेड कार्पेटही चर्चेचा विषय असतो. याच रेड कार्पेटवर प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचा बेबी बंप फ्लाँट केला.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री वानेसा हंडजेन्स हिने ऑस्कर २०२४ सोहळ्याला हजेरी लावली होती.

या अवॉर्ड सोहळ्यात तिने प्रेग्नंन्सीची घोषणा केली. ऑस्कर सोहळ्याचा प्री शो वानेसाने होस्ट केला.

ऑस्कर २०२४ साठी वानेसाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान करत ग्लॅमरस लूक केला होता. त्यावर मॅचिंग डायमंड ज्वेलरी घातली होती.

ऑस्कर २०२४च्या रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लाँट करत वानेसा हिने फोटोसाठी पोझ दिल्या.

याचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वानेसाने डिसेंबर २०२३ मध्ये कोल टकर याच्याशी लग्न केलं होतं. आता लग्नानंतर काहीच महिन्यांनी त्यांनी आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.