SHOCKING! बोल्ड अँड हॉट किम कार्दशियनचे तिसरं लग्नही तुटलं, समोर आलं 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:17 PM2021-02-20T12:17:55+5:302021-02-20T15:21:56+5:30

अमेरिकेची प्रसिद्ध टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार किम कार्दशियानने तिचा नवरा रॅपर कान्ये वेस्टशी लग्नाच्या 7 वर्षानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. (Photo Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अमेरिकन मीडियामध्ये असे वृत्त दिले गेले होते की किम आणि कान्ये बर्‍याच दिवसांपासून वेगळे राहत होते. (Photo Instagram)

कर्दाशियाने तिच्या घटस्फोटाच्या अर्जात आपल्या 4 मुलांची जॉईंट कस्टडीची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. (Photo Instagram)

किम आणि कान्येने 2012 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. (Photo Instagram)

यानंतर 2 वर्षांनी दोघांनीही इटलीमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. (Photo Instagram)

यानंतर हे कपल सातत्याने मीडियामध्ये चर्चेत राहिले. (Photo Instagram)

कान्ये वेस्ट हा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले जातेय ज्यामुळे किमशी असलेले त्याचं नातं टिकणं कठीण गेले. (Photo Instagram)

याआधी किम कार्दशियानचा दोनवेळा घटस्फोट झाला आहे. (Photo Instagram)

हॉलिवूडची अभिनेत्री, मॉडल आणि अनेक टीव्ही सीरीजमध्ये दिसलेली किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सिनेइंडस्ट्री प्रत्येक सेलिब्रेटीची स्टार व्हॅल्यू ठरते ती त्यांच्या फॅन फॉलोइंगने. (Photo Instagram)