'मुन्नाभाई MBBS'मधील डॉ. रुस्तम आठवतोय का?, आता ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 08:00 IST2023-01-10T08:00:00+5:302023-01-10T08:00:00+5:30
'Munnabhai MBBS' fame Rustam : मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये 'डॉक्टर रुस्तम'ची भूमिका कुरुश देबूने साकारली होती. कुरुष देबूचा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते चकित झाले आहेत.

२००३ साली आलेला संजय दत्तचा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा असा सदाबहार चित्रपट आहे, जो आजही लोकांना पाहायला आवडतो. या चित्रपटातील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
या चित्रपटात कुरुष देबूने 'डॉ. रुस्तम' ची भूमिका साकारली होती जो सतत चिडचिड करणारा होता. कुरुष देबूचा एक फोटो समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे आणि ते त्याला ओळखू शकत नाहीत.
यासोबतच त्याचे काही इंस्टाग्राम फोटोही व्हायरल होत आहेत.
कुरुष देबूचा हा फोटो जुना आहे पण आता तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. हा फोटो पाहून लोकांना त्यांच्या आवडत्या स्टारला ओळखता येत नाही.
व्हायरल होत असलेल्या कुरुशच्या फोटोमध्ये तो पिवळी पॅन्ट, पिवळा फुलांचा शर्ट, पोल्का डॉट टाय आणि लाल ब्लेझरमध्ये दिसत आहे.
या फोटोमध्ये डॉ. रुस्तुम उर्फ कुरुष देबू पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे. यामध्ये त्याचे वजनही पूर्वीच्या तुलनेत वाढलेले दिसते. कुरुष देबूचा हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
फोटोवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, "सर तुम्ही कुठे गायब झालात". तर दुसरीकडे, त्याच्या चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याबाबत दुसऱ्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर आणखी एक युजरने म्हणाला की, "काय अप्रतिम सूट. मस्त कॉम्बिनेशन".
मुन्नाभाई व्यतिरिक्त कुरुश देबू हॅप्पी हसबंड्स, फोर टू का वन, शिरीन फरहाद की तो निकल पडी, पत्र यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.