'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या लेकीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या सारखीच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 06:00 IST2022-07-01T06:00:00+5:302022-07-01T06:00:00+5:30
Bhagyashree : 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या लेकीने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानीने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
इतकेच नाही आईप्रमाणे लेकदेखील खूप सुंदर दिसते.
अवंतिकाने रोहन सिप्पीच्या सायकोलॉजिकल थ्रिलर-ड्रामा सीरिज 'मिथ्या'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
'मिथ्या' या सीरिजमधून निर्मात्यांनी अवंतिकाला लाँच केले आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत मुख्य़ भूमिकेत आहेत.
यापूर्वी, भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या 'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटाद्वारे सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे.
त्यानंतर आता भाग्यश्रीची मुलगी अवंतिका ग्लॅमरच्या जगात आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे.
मिथ्यामध्ये अवंतिका दासानी इंटेस लूकमध्ये पाहायला मिळाली होती.
अवंतिका दासानी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो शेअर करत असते.
अवंतिका दासानीचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.