व्हायरल गर्ल सपना व्यासच्या पाहा अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-20T14:29:14+5:302018-06-27T19:56:40+5:30
सध्या इंटरनेटवर एका तरुणीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही मुलगी हैदराबाद येथील रहिवासी असून, तिचे नाव सपना व्यास- पटेल असे आहे. सपनाचे फोटो व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे तिचे सौंदर्य आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर सपनाचा असा काही जलवा आहे की, नेटिझन्स तिच्या फोटोची एक झलक बघण्यास अक्षरश: आतुर असतात. सपना एक फिटनेस ट्रेनर असून, मॉडलिंगमध्येही नशीब आजमावत आहे. तिला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे असून, असे झाल्यास बहुतांश अभिनेत्रींना तिची धडकी भरेल यात शंका नाही.