ऐन पन्नाशीत बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला थाटायचाय संसार, म्हणते - लग्नासाठी मी कधीच तयार होते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 02:40 PM2024-06-25T14:40:50+5:302024-06-25T14:49:46+5:30

सलमान खान शिवाय बॉलिवूडची ही अभिनेत्री कधी लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल गदर २ चित्रपटाच्या यशानंतर चर्चेत आली आहे. गदर २ नंतर अमिषा सर्वत्र चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. अमिषा आस्क मी सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

अलीकडेच अमिषाने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांना तिच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल सांगितले. एका युजरने अमिषाला विचारले की, ती ४९ वर्षांची आहे, तिचा लग्न करण्याचा काही प्लॅन आहे का? या प्रश्नाचे उत्तर अमिषाने अतिशय मजेशीरपणे दिले.

यावेळी अमिषाने सलमान खानशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली कारण तोही अजूनही अविवाहित आहे.

अमिषा म्हणाली की, 'सलमानचे लग्न झालेले नाही आणि माझेही नाही? आम्ही लग्न करावे असे वाटते का? आमच्यासाठी तुमचा मुद्दा काय आहे, लग्न की चित्रपट प्रोजेक्ट?

अमिषाने पुढे सांगितले की, मी खूप दिवसांपासून लग्नासाठी तयार आहे, पण मला मुलगा सापडत नाहीये.

अमिषा पटेलच्या गदर २ बद्दल बोलायचे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने ६०० कोटींहून अधिक कमाई केली होती.

तारा सिंग आणि सकिना यांच्या जोडीला खूप प्रेम मिळाले. गदर २ च्या यशानंतर चाहते आता गदर ३ ची वाट पाहत आहेत. गदरचा पहिला भाग २२ वर्षांनंतर निर्मात्यांनी दुसरा भाग आणला. जो सुपरहिट ठरला.

विशेष म्हणजे अमिषा पटेल देखील गदर ३ चा भाग असणार आहे. गदर २ हिट झाल्यानंतरच निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग जाहीर केला.

गदर २ नंतर अमिषा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. आता चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.