सलमान खानसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीनं धर्मासाठी अभिनयातून घेतला संन्यास, मौलवीसोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:41 PM2024-05-24T12:41:38+5:302024-05-24T12:45:13+5:30

अभिनयात यशस्वी होऊनही काही अभिनेत्रींनी कलाविश्वाला रामराम ठोकला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने २०२० मध्ये बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती. तिने एका मौलवीशी लग्न केले होते.

सलमान खानसोबत झळकलेल्या एका अभिनेत्रीने बॉलिवूडनंतर साऊथमध्येही आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप उमटविली. मात्र एकेदिवशी तिने अभिनयातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. ही अभिनेत्री म्हणजे सना खान.

सना खानने इंडस्ट्री सोडण्यापूर्वी हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले होते. गेल्या चार वर्षांपासून ती सिने जगतापासून दूर आहे. सना खानने मौलवीशी लग्न करून आपले संपूर्ण आयुष्य अल्लाहला समर्पित केले आहे.

२००५ मध्ये रिलीज झालेल्या 'ये है हाय सोसायटी' या लो बजेट चित्रपटातून सना खानने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर तिने तामिळ चित्रपट 'ई'मध्ये डान्स नंबर केला. याशिवाय सना खानने तिच्या करिअरमध्ये ५० हून अधिक टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये काम केले होते.

सलमान खानचा जय हो चित्रपट २०१४ साली रिलीज झाला होता. यात सना खान महत्त्वाच्या भूमिकेत होती. सलमान आणि सना व्यतिरिक्त या चित्रपटात सोहेल खान, तब्बू, डॅनी डेंजोंगप्पा आणि सुनील शेट्टी हे कलाकार होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोहेल खानने केले होते.

सना २०२० साली शेवटची स्पेशल ओप्स या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याच वर्षी तिने सिनेइंडस्ट्रीला रामराम करायचा निर्णय घेतला होता. तिने अभिनयातून संन्यास घेण्याचा निर्णय सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सना खानने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय अशा वेळी घेतला जेव्हा ती वेदनादायक ब्रेकअपमधून जात होती. ती कोरिओग्राफर मेलविन लुईसला डेट करत होती. सना खाननेही फेब्रुवारी २०१९ मध्ये या वृत्ताला दुजोरा दिला होता. तथापि, फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांचे नाते तुटले.

यानंतर, नोव्हेंबर २०२० मध्ये, सना खानने मौलवी मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी लग्न करून चाहत्यांना चकित केले. सना खानच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जुलै २०२३ मध्ये, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले, ज्याचे नाव त्यांनी सय्यद तारिक जमील ठेवले.

इंडस्ट्रीला अलविदा केल्यानंतर सना खान बिझनेस वुमन बनली आहे. ती 'फेस स्पा बाय सना खान' आणि 'हया बाय सना खान'ची संस्थापक आहे. तिने पतीसोबत 'हयात वेलफेअर फाउंडेशन'ही सुरू केले आहे. रिपोर्ट्सनुसार, सना खानची एकूण संपत्ती २० कोटी रुपये आहे.