ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-01T05:13:53+5:302018-06-27T20:06:44+5:30
एकीकडे ऐशनं सलमानशी नातं तोंडलं... विवेकशी प्रेमाच्या चर्चा सुरु होत्या.. त्याचवेळी 'ढाई अक्षर प्रेम' के म्हणत तिनं ज्युनियर बी अभिषेक बच्चनला क्लीनबोल्ड केलं... 'कुछ ना कहो' आणि 'धूम-2'च्या सेटवर तर लव्हस्टोरी सुरु होती...ऐश्वर्या राय आणि अभिषेकसाठी 2007 हे वर्ष थोडं खास होतं.. कारण जानेवारी महिन्यात दोघांची प्रमुख भूमिका असलेला गुरु रुपेरी पडद्यावर झळकला.. रिलीजनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांची एन्गेजमेंटही झाली...ऐश-अभि 20 एप्रिल 2007 रोजी रेशीमगाठीत अडकले.. उत्तर भारतीय आणि बंगाली पद्धतीने दोघांचं शुभमंगल पार पडलं आणि ऐश्वर्या राय बनली ऐश्वर्या राय बच्चन....