ही आहे शाहरूख खानची बहीण अन् मेहुणा; पाकिस्तानात राहतात त्याचे ‘हे’ नातेवाईक, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-02T12:50:15+5:302018-06-27T20:06:23+5:30

शाहरूख खान आज ५२ वर्षांचा झाला आहे. २ नोव्हेंबर १९६५ मध्ये नवी दिल्ली येथे शाहरूखचा जन्म झाला. शाहरूखचे वडील मीर ताज मोहम्मद स्वातंत्रता संग्राम सेनानी होते, तर आई लतीफ फातिमा खान न्यायाधीश होत्या. या व्यतिरिक्त शाहरूखच्या परिवाराबद्दल सांगायचे झाल्यास त्याची मोठी बहीण शहनाज लालारूख, पत्नी गौरी खान आणि तीन मुले (आर्यन, सुहानी, अबराम) यांच्याविषयी शाहरूखचे चाहते जाणून आहेत. मात्र त्याचे काही इतरही नातेवाईक आहेत, ज्यांच्याविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. शाहरूखचे काही नातेवाईक पाकिस्तानात राहत असून, त्यांचेच फोटो आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. पाकिस्तानातील पेशावरचा ख्वानी बाजार असा परिसर ज्याच्या शाहवाली कताल गल्लीत शाहरूखचे कजिंस म्हणजेच काकाचे मुले राहतात. शाहरूखचे काका गुलाम मोहम्मद गामा स्वातंत्र्य सैनिक होते.