शहनाज गिलच्या सुपर ग्लॅमरस लुकमुळे चाहते घायाळ, पाहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 13:23 IST2021-02-27T13:17:14+5:302021-02-27T13:23:14+5:30

शहनाज गिल आपल्या शानदार फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. शहनजच्या हटके स्टाइलची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. शहनाजने नुकतेच फोटोशूट केले यावेळी तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. शहनाजच्या या ड्रेसचे डिझाइन अतिशय ग्लॅमरस होतं.

या ड्रेसमुळे शहनाजला सुंदर आणि बोल्ड लुक मिळाला.

तिच्या या ग्लॅमरस अवतारातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

शहनाजच्या या बोल्ड ड्रेसमधील लुक पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

लाइट टोन मेकअप आणि आकर्षक हेअर स्टाइलमध्ये शहनाज अतिशय सुंदर दिसतेय.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शहनाज गिल एकसे बढकर एक स्टायलिश लुकमधील फोटो चाहत्यांना पाहायला मिळताहेत.

तिचे विविध अंदाजातील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शहनाज पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाते.

वजन कमी करण्यासाठी डायटिंग करत असल्याची कबुली शहनाजने दिली होती.

चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी वजन कमी करत असल्याचेही तिने सांगितले होते.