सिनेमांपासून आहे दूर, मग सैफची Ex पत्नी कसं चालवते घर? या कामातून अमृता सिंह कमावते कोट्यवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:49 PM2024-05-10T15:49:07+5:302024-05-10T15:57:30+5:30

सिनेमांपासून दूर राहूनही सैफची एक्स पत्नी कमावते कोट्यवधी, जाणून घ्या अमृता सिंहची प्रॉपर्टी

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंहने ८०-९०चं दशक गाजवलं. अभिनयाबरोबरच अमृता सिंहच्या सौंदर्याचीही चर्चा व्हायची. अभिनयाने एक काळ गाजवलेली सैफ अली खानची एक्स पत्नी आता मात्र सिनेमापासून दूर आहे.

अमृता आणि सैफने १९९१ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. २००४मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.

अमृता आणि सैफ यांना सारा व इब्राहिम ही दोन मुले आहेत. साराने आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर इब्राहिमनेही नुकतंच अभिनयात पदार्पण केलं आहे.

सैफपासून वेगळे झाल्यानंतर अमृताला ५ कोटी रुपये पोटगी मिळाली होती. त्याबरोबरच त्यांना मुलांबरोबर राहण्यासाठी एक बंगलाही देण्यात आला होता. आता अमृता सारा आणि इब्राहिमसह तिथेच राहते.

सैफपासून घटस्फोट घेतल्यानंतर मुलांच्या संगोपनासाठी अमृताला दर महिन्याला १ लाख रुपये मिळत होते. इब्राहिम १८ वर्षांचा होईपर्यंत अमृताला सैफकडून हे पैसे मिळत होते.

मोठ्या पडद्यापासून दूर राहूनही अमृता सिंह कोट्यवधींची कमाई करते. ब्रँड एडरॉडमेंट आणि जाहिरातींसाठी ती २० लाख रुपये मानधन घेते.

याशिवाय तिचा मुंबईत स्वत:चा आलिशान फ्लॅट आहे. त्याचबरोबरच तिने फार्म हाऊसही खरेदी केलं आहे.

सैफची एक्स पत्नी अमृता सिंह तब्बल १५ मिलियन डॉलर संपत्तीची मालकीण आहे.