या कारणामुळे कधीच मीडियासमोर येत नाही आलिया भट्टची ही बहिण, प्रसिद्धीपासून दूरच राहणे करते पसंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 03:32 PM2021-06-05T15:32:22+5:302021-06-05T15:43:06+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि बडे कुटुंब म्हणजे भट्ट कुटुंबीय. हिंदी चित्रपटसृष्टीत भट्ट कुटुंब कायमच चर्चेत असतं. घरातली प्रत्येक व्यक्तीविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो.

महेश भट्ट यांच्या लेकींनीही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्या बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं.

पूजा आणि आलिया या महेश भट्ट यांच्या लेकी आहेत हे सर्वश्रुत आहे.

मात्र महेश भट्ट यांना तिसरी लेकही आहे आणि तिच्याबाबत फारसं कुणालाही माहिती नाही.

महेश आणि सोनी राजदान यांच्या दोन लेकी आहेत.एकीचं नाव शाहिन तर दुसरीचे नाव आलिया भट्ट असं आहे.

1988 साली शाहिनचा जन्म झाला. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे.

त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. वयाच्या तेराव्या वर्षी शाहिन डिप्रेशनमध्ये गेली.

एका मुलाखतीमध्ये आलियानं याबाबत कबुली दिली होती. डिप्रेशनसह निद्रानाश या आजाराने शाहिन त्रस्त होती.

शाहिन कधीही अभिनय करताना दिसली नाही. मात्र ती या ना त्या कारणामुळे सिनेमाशी जोडली गेली आहे.

'जिस्म-2', 'जहर' या सिनेमासाठी तिने डायलॉग्स लिहले होते.तसंच 'राज-3' सिनेमात शाहिननं सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून जबाबदारी पार पाडली होती.