PHOTOS : अंकिता लोखंडेच्या ब्राइडल लूकमधील मस्तमौला अदा पाहून चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 13:51 IST2020-03-06T13:45:51+5:302020-03-06T13:51:42+5:30

अंकिता लोखंडेचा दुसरा हिंदी चित्रपट बागी ३ नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या सिनेमात अंकिताने श्रद्धा कपूरची बहिण रूचीची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटात अंकिता, श्रद्धा सोबत टायगर श्रॉफ व रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे.
अंकिताचा हा ब्राइडल लूक बागी ३ चित्रपटातील आहे.
या लूकमधील फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोंना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.
या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.
या चित्रपटात भंकस या गाण्यात अंकिता लोखंडे व रितेशचं लग्न होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे अंकिताने हा बाइडल लूक केला आहे.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.
अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.