पापा बोनी कपूरपेक्षा ‘मॉम’ होती जान्हवीच्या जवळ,कायम लेकींसह दिसायची श्रीदेवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-02-26T07:20:59+5:302018-06-27T19:55:54+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे सा-यांनाच मोठा सदमा बसलाय.कुणी तरी ‘मिस्टर इंडिया’ येईल आणि श्रीदेवीरुपी तो ‘नगिना’ परत आणेल अशी आस रसिकांना लागलीय.त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.त्यांच्या चित्रपटसृष्टी,फॅन्ससह कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय.श्रीदेवी या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशा नायिका होत्याच. त्यासोबत रिअल लाईफमध्ये त्या प्रेमळ आईसुद्धा होत्या. जान्हवी आणि खुशी या दोन्ही लेकींसह श्रीदेवी यांचं एक वेगळं आणि घट्ट नातं होतं. ब-याचदा श्रीदेवी आपल्या लेकींसह बॉलिवूड इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये पाहायला मिळायच्या.त्यामुळे या दोन्ही लेकी वडिलांपेक्षा आईजवळ होत्या.मात्र श्रीदेवी यांच्या निधनामुळे या लेकींचे मातृछत्र हरपलंय.