कधीकाळी अशी दिसायची मल्लिका शेरावत; पहा तिचे फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-24T14:38:41+5:302018-06-27T20:07:37+5:30
अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने वयाचे ४० वर्षे पूर्ण केले आहेत. २४ आॅक्टोबर १९७६ मध्ये हरियाणा येथे एका जाट परिवारात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रिमा लांबा असे आहे. बॉलिवूडमध्ये तिने मल्लिका हे नाव धारण केले, तर शेरावत हे तिच्या आईचे सरनेम आहे. खरं तर मल्लिकाला नेहमीच आईचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळेच तिने आईचे अडनाव तिच्या नावासमोर लावले आहे. असे म्हटले जाते की, मल्लिकाचे वडील तिच्या अभिनेत्री बनण्याच्या निर्णयावर नाराज होते. मात्र आता त्यांच्यातील नाते सामान्य आहे. मल्लिकाच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा हा खास फोटो वृत्तांत...