'मकडी'मधली मुन्नी आठवतेय का? आता दिसते इतकी ग्लॅमरस, ओळखताही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:05 IST2025-05-21T12:00:51+5:302025-05-21T12:05:41+5:30

अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिने 'मकडी'मध्ये मुन्नी आणि चुन्नी अशी दुहेरी भूमिका साकारली होती.

२००२ साली प्रदर्शित झालेला 'मकडी' सिनेमा हा बॉलिवूडमधील गाजलेला हॉरर चित्रपट. ९०च्या दशकातील मुलांच्या आजही हा सिनेमा चांगलाच लक्षात असेल.

या सिनेमात छोट्या मुन्नी आणि चुन्नी या दोन बहिणींनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिने 'मकडी'मध्ये मुन्नी आणि चुन्नी अशी दुहेरी भूमिका साकारली होती.

श्वेताने साकारलेली मुन्नी-चुन्नीची भूमिका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. पण, ही छोटी मुन्नी आता मात्र मोठी झाली आहे.

आता श्वेताला ओळखणंही कठीण झालं आहे. 'मकडी'मधली छोटी मुन्नी आता ग्लॅमरस झाली आहे.

श्वेताने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तिने अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

क्रिमिनल जस्टिस ४ मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शुक्राणू, बद्रि की दुल्हनिया, लाइफ हो तो ऐसी अशा सिनेमांमध्ये ती झळकली.

करिश्मा का करिश्मा, कहानी घर घर की या मालिकांमध्येही श्वेता दिसली होती.

श्वेताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा श्वेता तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.